आडवली येथील चिरेखाणीचे साहित्य चोरीला

 

सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक किंमतीची यंत्र सामग्रीची चोरी

आचरा–अर्जुन बापर्डेकर : आडवली भटवाडी येथील दुर्गा प्रसाद गजानन तुळपुळे यांच्या चिरेखाणीवरील सुमारे २१६५००रुपयांची यंत्र सामग्री अज्ञाताने चोरुन नेण्याची घटना गुरुवारी ४जुलै रोजी उघडकीस आली.याबाबत अज्ञाताविरोधात आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुर्गा प्रसाद तुळपुळे यांनी आचरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत पावसाळा हंगाम सुरू असल्याने जून महिन्यापासूनच चिरेखाण व्यवसाय बंद आहे.त्यामुळेआवश्यक ती यंत्र सामग्री चिरेखाणी लगत पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आली होती. गुरुवारी चार जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी पुजेसाठी फुले काढायला गेलो असता.शेडला दक्षिण बाजूने लावलेले२५ते३० चिरे कुणीतरी अज्ञाताने काढलेले आढळून आले.संशय आला म्हणून पहाणी केली असता पाॅवर टिलर,तीन कटींग मोटार,तीन वायरबंडलय, दोन कटींग ब्लेड,दोन डंपर स्टेपनी, स्क्रू ड्रायव्हर,आदी साहित्य,इण्डेन गॅस सिलिंडर आदी मिळून सुमारे २१६५००रुपये किंमतीचा माल चोरीस गेला.घटनेची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, सहा.पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, पोलीस हवालदार मिलिंद परब,बाळू कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला .अधिक तपास सपोनी अनिल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.