खेड(प्रतिनिधी) मटण-मच्छी मार्केट परिसरासह ठिकाणी बंद झालेले जुगार अड्डे पुन्हा असल्याची माहिती उपलब्ध झाली असून हे अड्डे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई करत शहरात सुरू असलेल्या मटका जुगार व्यावसायिकांना दणका दिला होता. या कारवाईचा धसका घेत गेल्या
काही दिवसांपासून मटके जुगार अड्डे बंद होते. मात्र पुन्हा मटण- मच्छी मार्केट परिसरासह अन्य दोन ठिकाणी मटके जुगारअड्डे सुरू झाले असल्याचे समजते.
दरम्यान, भरणे परिसरात ही मटका जुगार सुरू असून चिमणी पाखर हा व्यवसाय बेकायदा सुरूच असून याकडे मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे











