तीलारी धरण 55,%भरले!
काही ठिकाणी रस्त्यावर पाणी
सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज
दोडामार्ग | सुहास देसाई : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी मुख्ख धरण अद्याप भरले नसून तेरवण- मेढे उनैयी बंधारा पूर्ण क्षमतेने भरले आहे यामुळे या बंधारेचे सर्व दरवाजे खुले करण्यात आले आहे त्यामुळे तिलारी नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढणार आहे त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या गावांना सकाळ पासून जोरदार पाऊस पडत असल्याने सावधावतेचा ईशारा देण्यात आला आहे तालुक्यातील सर्व महत्त्वाची रस्ते वाहतूक नवीन पुलामुळे सोयीस्कर झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तर साइड पट्टी व गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचून जलमय झाले आहे याकडे सार्व. बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे
दोडामार्ग ते बेळगाव मार्गावरील वाहतूक वारंवार भेडशी पुलावर पाणी असायचे त्यामुळे वळवायला लागत होती मात्र भेडशी पूलामुळे वाहतूक सुरळीत सुरू आहे तर दोडामार्ग ते पिकुळे
रस्त्यावरील झरेबांबर येथे नवीन पुलामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे ठीक ठिकाणी नव्याने पूल झाल्याने नागरिकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे












