रघुवीर घाटात मद्यपान करत हुल्लडबाजी करणाऱ्या वर पोलिसांची कारवाई

खेड(प्रतिनिधी) 

पावसाळा सुरू असल्याने तालुक्यातील रघुवीर घाटाचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे. धबधबे ओसंडून वाहत आहेत. अशातच पावसाळी पिकनिकची मजा घेण्यासाठी रघुवीर घाटात गेलेल्या हुल्लडबाज तरुणांवर खेड पोलिसांनी कारवाई केली आहे.

  रघुवीर घाटातील धबधबे प्रवाहित झाल्यामुळे रघुवीर घाटात धबधब्याला जाऊन मजामस्ती करणार्यांची गर्दी सध्या रघुवीर घाटात वाढली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी रघुवीर घाटात पर्यटनाला येऊन रस्त्यामध्ये मद्यपान करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर खेड पोलिसांनी कारवाई करत दारू जप्त केली . रघुवीर घाटात दारू पिऊन स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या पर्यटकांच्या विरोधात खेड पोलिसांनी कारवाई केल्याने सर्वसामान्य पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाळी पर्यटन करताना किंवा पिकनिकला जाताना घाटात गाडी उभी करून मजामस्ती करणे किंवा दारू पार्टी करणे कायद्यांनव्ये गुन्हा आहे. त्यामुळे पर्यटकांनी असे कृत्य करू नये असे आवाहन खेड पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी केले आहे.