हरकुळ येथे निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचा तंत्राबाबत मार्गदर्शन

कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाटचा कृषी दुतांचा उपक्रम

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषीदूत यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत हरकुळ येथे निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे तंत्र याचे मार्गदर्शन करण्यात आले.

सुक्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते, कर्बोदकांचे प्रमाण नगण्य असते, तसेच प्रथिने अत्यल्प असतात, त्यामुळे ती पचण्यास कठीण जातात. हे लक्षात घेऊन सुक्या निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यात वापरला तर अनुकूल परिणाम दूध उत्पादन आणि वाढीवर होतो.

सतत सुका चारा खाऊ घातल्यामुळे खनिज द्रव्ये, प्रथिने आणि कर्बोदकांची कमतरता निर्माण होऊन जनावरांना शारीरिक आजार होण्याचे शक्यता असते. सुक्या चाऱ्यामध्ये प्रथिने कमी असल्यामुळे जनावर ढेरपोटे (जलोदर) दिसते. अशा सुक्या निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यात वापरला, तर त्याचा अनुकूल परिणाम दूध उत्पादन आणि जनावरांच्या वाढीवर होतो.

यावेळी योगेश दंताळ,ऋतुराज सावंत, दुर्वेश रावराणे,नमित आचरेकर,सौरभ पुजारी,हर्ष शेट्ये, सोमनाथ वेटे,मोहनिश देसाई,दिपक वाडेकर,विनायक मोडक आदी कृषीदूत उपस्थित होते.