भाजपा नेते निलेश राणे यांचा तोडणकर कुटुंबियांना मदतीचा हात

 

मालवण | प्रतिनिधी : वायरी भूतनाथ मोरेश्वर वाडी येथील विक्रम तोडणकर यांचे राहते घर काही दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जळाले. यात तोडणकर यांचा संपूर्ण घर संसार जळून गेला. मालवण दौऱ्यावर असलेल्या भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी सकाळी भेट देऊन जळालेल्या घराची पाहणी करत विक्रम तोडणकर कुटुंबीय यांची भेट घेतली. यावेळी राणे यांनी तोडणकर यांना धीर देत नवीन घराच्या बांधकामासाठी मदतीचा हात दिला.