देऊळवाडा मित्रमंडळ व नागरिकांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी नागरिकांना शब्द दिल्या प्रमाणे स्वखर्चातून देऊळवाडा रामेश्वर मंदिर जवळ टू व्हीलर गाड्या पर्किंग ठिकाणी जाणारा जोडरस्ता गटार उभारणी करून दिली आहे.
खा. नारायण राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या माध्यमातून जनसेवेसाठी सदैव तप्तर असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.
माजी नगरसेवक जगदीश गांवकर, नामदेव घाडी, शिवाजी म्हापणकर, दादू डिचोलकर, दशरथ वालावलकर, गोपी मालवणकर, राहुल केळूसकर, शेखर केळूसकर, जितु मराळ, संतोष इब्रामपुरकर, संतोष नेरकर, सुदेश मालवणकर, बाबू मालवणकर, हरेश फणसेकर, रोहन वाळके, नाना घाडी यांसह देऊळवाडा मित्रमंडळ व नागरिकांनी कार्यसम्राट नगरसेवक दीपक पाटकर यांचे आभार मानले.









