खेडमध्ये पावसाची विश्रांती , जनजीवन पूर्वपदावर

नद्यांची पातळी घटली , पुराचा धोका टळला

खेड(प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसां पासून शहरासह ग्रामीण भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने जन जीवन विस्कळीत झाले होते. मात्र मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने जन जीवन हळूहळू पूर्व पदावर आले आहे

 

 

दोन पडत असलेल्या पावसाने जगबुडी नदीने  धोकादायक पातळी ओलांडून वाहत राहिल्याने शहरावर पुराचा धोका कायम राहिला होता मात्र मंगळवारी सकाळ पासून पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला तर पावसाच्या विश्रांती ने जगबुडी सह नारिंगी चोरद नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याने सद्य स्थितीत पुराचा धोका देखील टळला आहे.

 

 

मात्र जगबुडी नदी इशारा पातळी ५.४० मीटर वर वाहत आहे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्या नुसार पावसाचा जोर वाढल्यास तालुक्यात पूर सदृश्य निर्माण होण्याची शक्यता कायम आहे