राजापूरात ‘खासदार चषक’ पावसाळी रबर बॉल क्रिकेट प्रीमिअर लीग- 2024 स्पर्धेचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): भाजपाचे इंजिनीअरिंग सेल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख आशिष मालवणकर मित्रमंडळाचे वतीने येथील गुरुवार 1 ऑगस्ट 2024 ते रविवार 4 ऑगस्ट 2024 या कालावधीत राजीव गांधी क्रिडांगणावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत ‘खासदार चषक’ पावसाळी रबर बॉल क्रिकेट प्रीमिअर लीग- 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

ही स्पर्धा शहर, वाडी आणि गाव मर्यादित (1) संघ, 1 आयकॉन अशी असणार आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.
या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,000/- आणि चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000/- आणि चषक, तृतीय पारितोषिक- रोख रक्कम 5,000/- आणि चषक ठेवण्यात आले आहे.
अंतिम सामना सामनावीर – “VIRAT” स्पोर्टवेअर टि शर्ट, उत्कृष्ट गोलंदाज – “VIRAT” स्पोर्टवेअर टि शर्ट, उत्कृष्ट फलंदाज – “VIRAT” स्पोर्टवेअर टि शर्ट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – “VIRAT” स्पोर्टवेअर टि शर्ट, उत्कृष्ट आयकॉन – “VIRAT” स्पोर्टवेअर टि शर्ट, मालिकावीर- “VIRAT” स्पोर्टवेअर टि शर्ट आणि शॉर्ट्स अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी रूपये दोन हजार ठेवण्यात आली असून नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आशिष मालवणकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.