महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्यांचा दौरा कार्यक्रम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे, डॉ. श्रीमती निलीमा सरप (लखाडे), ज्योतीराम माना चव्हाण हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाकरिता १५ व १६ जुलै २०२४ या कालावधित जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार १५ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता सिंधुदूर्ग येथून रत्नागिरीकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे मुक्काम.

 

मंगळवार १६ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ ते १.३० या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत तिल्लोरी कुणबी/तिलोरी कुणबी जाती समुहाच्या संदर्भात बैठक. १ जून २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती या संवर्गास वितरीत केलेली जात प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रे यांचा आढावा. रत्नागिरी जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अखत्यारीतील आश्रम शाळांचा आढावा. रत्नागिरी जिल्ह्यातील तिल्लोरी कुणबी जात समूहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, रत्नागिरी).
बुधवार १७ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून पुणेकडे प्रयाण.