खेड(प्रतिनिधी) तालुक्यात गेले महिना भरा पासून विक्रमी पाऊस पडला असून त्यामुळे धरणांमध्ये ६० टक्केपेक्षा जास्त पाणी साठा जमा झाला आहे आगामी कालावधीत असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास तालुक्यातील खालावलेली भूजल पाळी देखील पूर्ववत येण्याचा आशावाद व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील धरण क्षेत्रात पाण्याच्या पाळीबाबत उपविभागीय अभियंता सत्यजित गोसावी अभियंता एस. आर. ढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील नातूवाडी मध्यम प्रकल्पात ८७.२१ मीटर पाण्याची पातळी असून उपयुक्त पाणी साठा १७.९३६ दशलक्ष घन मीटर आहे. हे धरण ६५.८७ टक्के भरले आहे. एकूण ३६० मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे.
पिंपळवाडी लघु पाटबंधारे १२६.०२ मीटर पाण्याची असून १७९४० घन मीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. धरण ८७.३७ टक्के भरले असून, धरण १६४४ मिलिमीटर पाऊस नोंद करण्यात आला आहे. या धरणातून सांडव्या मार्फत ४०.५० घनमीटर प्रति पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे विमोचकाच्या ठिकाणी ०.८५ धन मीटर पाण्याचा विसर्ग होत आहे.
शिरवली प्रकल्पात पाण्याची पातळी ३९.७० मीटर असून, उपयुक्त पाणीसाठा २९७९ ला धन मीटर आहे. हे धरण १०० टक्के भरले असून ५०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या धरणातून ८.३८९ मीटर प्रति सेकंदास विसर्ग होत आहे
कोंडीवली येथील धरणाची पाण्याची पातळी १२४.८० मीटर असून २.२२६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. धरण ६८.६२ टक्के धरण भरले असून धरण क्षेत्रात १२७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या धरणातून १७०० मीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणाची पूर्ण संचय १२ मीटर इतकी आहे. परंतु धरण सुरक्षिततेच्या दृष्टिने छेद पाणीपातळी २३.२० मीटर इनकी नियंत्रित करण्यात आली आहे.पाण्याची पाळी ११६.८० मीटर
एवढी असून, उपयुक्त पाणीसाठा ४.५३ दशलक्ष घनमीटर एवढा आहे हे धरण ६९.९५ टक्के भरले असून, धरण क्षेत्रात १ हजार ४३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेलारवाडी धरण क्षेत्रात पाण्याची पातळी ६९.५० मीटर असून, पाणीसाठा ५.९८० दशलक्ष घनमीटर एवढा आहे. हे धरण ३८.१६ टक्के भरले असून, धरण १ हजार ६४४ मिलिमीटर
पावसाची नोंद झाली आहे.











