खेड | प्रतिनिधी : खेड आंबवली मार्गावर म्हाळुंगे गावानजीक कार रस्त्या शेजारी उलटून अपघात झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात कार मधील चार जण जखमी झाले
कार (क्र एम एच ०१ सी आर ०७४६) ही मुंबईहुन नांदीवलीकडे जात असताना कार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट रस्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन उलटली. या अपघाताची माहिती काही ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून १०८ रुग्ण वाहिकेच्या मदतीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमीं पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून मुंबई येथे हलविण्यात आल्याने त्यांची नावे मात्र समजू शकली नाही.












