रानभाज्या व रानभाज्यांपासून बनविलेल्या पदार्थांच्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

 

देवगड (प्रतिनिधी) येथील शेठ म.ग. हायस्कूलमध्ये रानभाज्या व रानभाज्यांपासून बनविलेल्या खाद्य पदार्थांचे प्रदर्शन, विक्री व पाककला स्पर्धा शाळेत आयोजित करण्यात आलेली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन देवगड एज्युकेशन बोर्ड, समन्वय समितीचे अध्यक्ष व स्थानीय समितीचे सचिव ॲड.अविनाश माणगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी मुख्याध्यापक व स्थानीय समिती सदस्य चंद्रकांत शिंगाडे, स्थानीय समिती सदस्या व या स्पर्धेचे परीक्षक सौ अनुश्री पारकर आणि दुसरे परीक्षक सौ विद्या माणगावकर, मुख्याध्यापक महादेव घोलराखे आधी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी इयत्ता आठवी आणि नववी मधील एकूण 35 विद्यार्थ्यांनी रानभाज्या आणि या रानभाज्यांपासून खाद्यपदार्थ बनवून या प्रदर्शनात सहभाग घेतलेला होता. या निमित्ताने या पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेचे परीक्षण अनुश्री पारकर आणि विद्या माणगावकर यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांचे देखील कौतुक केले.

या स्पर्धेमधील विजेते पुढील प्रमाणे-: प्रथम क्रमांक-सानवी विनोद मालवणकर व मुस्कान इरफान शेख. पदार्थ-शेवग्याचा पराठा.

द्वितीय क्रमांक-आयुष श्रीरंग भिडे पदार्थ-तेंडल्याची इडली.

तृतीय क्रमांक-वृषभ बाळकृष्ण धुरी. पदार्थ शेवग्याची भाजी व भाकरी.

उत्तेजनार्थ प्रथम-स्वरा सदाशिव भुजबळ व चैत्राली संदीप कोयंडे. पदार्थ- फोडशीची भजी.

उत्तेजनार्थ द्वितीय-वेदांत संदीप शिंदे व राजेश भालचंद्र शिंदे. पदार्थ टाकळ्याची भाजी व भाकरी.

उत्तेजनार्थ तृतीय-चिन्मयी महेश भडसाळे. पदार्थ शेवग्याची भाजी व चपाती.

शाळेच्या या उपक्रमास पालक वर्गाचे देखील उत्तम सहकार्य व प्रोत्साहन लाभले. या उपक्रमाचे संस्था पदाधिकारी आणि पालक वर्गाने देखील कौतुक केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील आफ्रीन पठाण, रश्मी ठाकूर, प्रवीण खडपकर, राजेंद्र कोयंडे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. मुख्याध्यापक महादेव घोलराखे पर्यवेक्षिका निशा दहिबावकर यांचे प्रोत्साहन मिळाले,इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.