जनतेचा निर्णय पक्का.. आमदार वैभव नाईक यांना कन्फर्म धक्का !

 

भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची टीका

मालवण | प्रतिनिधी : सत्तेत असताना काही करता आले नाही, मात्र आता निवडणुक तोंडावर आ. वैभव नाईक यांची नौटंकी सुरु आहे. गेल्या १० वर्षात आश्वासना पलीकडे काहीच करता आलं नाही. पण जनता घरचा रस्ता दाखवणार हे लक्षात आल्यावर आमदार वैभव नाईक हे जनतेची काळजी आहे असा दिखावा करत आहेत. अशी टीका भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी ठाकरे गट आमदार वैभव नाईक यांच्यावर केली आहे.

चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आमदार वैभव नाईक विधान भवनात तर कधी रस्त्यावर नौटंगी करताना दिसत आहेत. कधी अधिकाऱ्यावर ओरडणे तर कधी आंदोलनाची भाषा करणे अशी ड्रामेबाजी करताना दिसत आहेत. सत्ता असताना जर वेळोवेळी लोकांच्या प्रश्नांवर मंत्रालयात जाऊन धोरणात्मक निर्णय घेणेबाबत पुढाकार घेतला असता आणि सत्तेचा वापर जनतेसाठी केला असता तर अशी नौटंकी करण्याची वेळ आली नसती.

जनता आता समजून चुकली आहे की जे सत्तेत असताना काही करु शकले नाहीत ते आता काय विकास करणार ? आपल्या भविष्याचा ग्राउंड रिपोर्ट त्यांच्या लक्षात आला असून दिवा विझताना जशी फडफड वाढते, तशी विधानसभा निवडणूक जवळ येईल, तशी ती फडफड वाढत जाईल. मात्र जनतेचा निर्णय पक्का आमदार वैभव नाईक यांना कन्फर्म धक्का असे धोंडी चिंदरकर यांनी म्हटले आहे.