मालवण : प्रभु श्री राम यांचा अयोध्या नगरी येथील नवनिर्माण मंदिरातील प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न होत असताना सर्वत्र भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मेढा येथील मौनीनाथ मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. रामाच्या मूर्तीवर अभिषेक, तीर्थप्रसाद, आणि दीपोत्सव करण्यात आला. राम नामाचा गजर यावेळी करण्यात आला. सायंकाळी दीपोत्सव करण्यात आला.












