अमित खोत | मालवण : मालवणात मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी पाणी भरले आहेत. जनजिवन विस्कळीत बनले आहे.
मालवण शहरात अनेक ठिकाणी सखल पाणी भरले आहे. काही ठिकाणी घरांना पाण्याने वेढा दिला आहे. काही रस्ते पाण्याखाली आहेत. गटार ओव्हरफ्लो झाले आहेत. रस्त्यावरून पाणी वाहत आहेत.
तालुक्यात बागायत मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाहणाऱ्या पाण्याला मोठया प्रमाणात जोर असल्याने वाहने दोन्ही बाजूला थांबून होती. तर मालवण आचरा मुख्य मार्गवर चिंदर येथे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
गोठणे ते किर्लोस असणाऱ्या बंधाऱ्यावर पाणी चढले असून मार्ग बंद झाला आहे. किर्लोसला जाणेसाठी पर्यायी मार्ग आहे.
अनेक ठिकाणी हीच स्थिती कायम आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (रविवारी) पावसाचा रेड अलर्ट असून पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर
मालवण बंदरात तीन नंबरचा वादळी बावटा लावण्यात आला असून पावसासोबत वाऱ्यांचा वेगही वाढणार आहे. मच्छिमार व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.












