आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून वाळू व्यावसायिक व डंपर व्यवसायिकांचे प्रश्न सोडवणार : दत्ता सामंत

मालवण तालुक्यातील वाळू व्यावसायिक व डंपर व्यवसायिकांनी घेतली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट 

मालवण | प्रतिनिधी : वाळू व्यावसायिक तसेच डंपर व्यवसायिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चित सोडवले जातील. अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वाळू व्यवसाय व डंपर व्यवसायिक यांच्या शिष्टमंडळाला दिली.

 

मालवण तालुक्यातील वाळू व्यावसायिक तसेच डंपर व्यवसाय यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेतली व व्यवसायातील अडचणी, रखडलेली वाळू टेंडर प्रक्रिया तसेच टेंडर प्रक्रिया गतिमान होण्यासाठी प्रशासनाकडून न मिळणारे सहकार्य या सर्व बाबतीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे भूमिका मांडली. दत्ता सामंत यांनी व्यवसायिकांचे म्हणणे ऐकून घेत आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधला व व्यवसायिकांच्या असलेल्या समस्या त्यांच्याकडे पोहोचवल्या आहेत. दरम्यान आमदार निलेश राणे यांनी व्यावसायिकांचे जे काही प्रश्न असतील, प्रशासन स्तरावर ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याची ग्वाही दिली आहे.

आमदार निलेश राणे यांची मालवण दौऱ्यात भेट घेऊन याबाबत निवेदन दिले जाईल

अशी माहिती संजय वराडकर यांनी दिली. यावेळी शिवसेना मालवण शहर संघटक राजू बिडये यांसह अन्य पदाधिकारी व वाळू व डंपर व्यावसायिक उपस्थित होते.