वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील
रत्नागिरी । प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हयात आडिवरे (धारतळे उपकेंद्र, राजापूर १ उपविभाग), पूनस (लांजा उपकेंद्र, लांजा उपविभाग), पनवल (पनवल उपकेंद्र, रत्नागिरी ग्रामीण उपविभाग), दाभोळ (दापोली उपकेंद्र, दापोली उपविभाग), नाटे (धारतळे उपकेंद्र, राजापूर १ उपविभाग) या फिडरवरील ८ गावातील ८८ वितरण रोहित्रावरील वीजपुरवठा बाधित झाला.
परिणामी कृषी ५२०, अकृषी ४६८० ग्राहकांचा वीजपुरवठा प्रभावित झाला. अशंतः या फिडरवरील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
लघुदाब वाहिनीचे ५३, उच्चदाब वाहिनीचे १८ वीजखांब वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे क्षतिग्रस्त झाले त्यापैकी प्रत्येकी ७ वीज खांब पूर्ववत उभा करण्यात आले आहेत. त्यामुळे कृषी ५८, अकृषी ५२० ग्राहकांचा वीजपुरवठा प्रभावित झाला आहे. महावितरण कंपनीची यंत्रणा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल. काही ठिकाणीं सुरक्षेच्या कारणास्तव वीज पुरवठा बंद ठेवला जाऊ शकतो. तरी ग्राहकांनी संयम बाळगून सहकार्य करावे, असे महावितरण कंपनीचे विनम्र आवाहन आहे.











