जिल्हास्तरीय तायक्वांदो अजिंक्य पद स्पर्धेत तायक्वांदो अकॅडमी राजापूर अजिंक्य

राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद क्युरोगी व पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप 2024-25 रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व तायक्वांदो अकॅडमी राजापूर आणि राजापूर तालुका शिवसेना यांच्या सौजन्याने 22 वी सिनियर महिला व पुरुष ज्युनिअर आणि सबज्युनिअर 7 वी कॅडेट व मुले व मुली स्पर्धा नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन राजापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेला नऊ तालुक्यातील 400 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

 

या स्पर्धेचा उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र क्रीकेट असोशिएशन उपाध्यक्ष तथा उद्योजक किरण सामंत, उपजिल्हाप्रमुख शिवसेना रत्नागिरी तथा विशेष निमंत्रित सदस्य नियोजन मंडळ रत्नागिरी, अशफाक हाजू, महाराष्ट्र शासन” गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हाअध्यक्ष व्यंकटेशवरराव कररा, राजापूर तालुका बौद्धजन संघाचे अध्यक्ष महादेव गोठणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिवसेना जिल्हा व तालुका पदाधिकारी, बौध्दजन संघांच पदाधिकारी, तायक्वांदो अकॅडमी राजापूरचे सदस्य, जिल्हा असोशिएशनचे पदाधिकारी, पालक, खेळाडू, पत्रकार क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

 

या स्पर्धेमध्ये राजापूर तालुका अजिंक्य ठरला. यामध्ये एकूण 25 सुवर्ण पदक, 18 रोप्य पदक व 09 कांस्य पदकांची कमाई करत क्युरोगी प्रकारात प्रथम क्रमांक तर पूमसे प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तालुक्यातील सर्व खेळाडूना तायक्वांदो अकॅडमी राजापूरचे प्रमुख प्रशिक्षक मुकेश शांताराम नाचरे, सहप्रशिक्षक युवराज मोरे, सौ. मधुरा नाचरे मार्गदर्शन करत आहेत.

 

विविध वजनी गटात खेळल्या गेलेल्या स्पर्धेत पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :-स्पेशल मुले श्वेत नाचरे -( U-18) – सुवर्ण, यश चव्हाण – ( U – 16 ) – सुवर्ण, आर्य प्रभूदेसाई – ( U – 21 ) – सहभाग, स्पेशल मुली मृदूला घुमे ( U – 20 ) – सुवर्ण स्वामिनी चव्हाण ( U – 22 ) – सहभाग दार्शी भोसले ( 0 – 24 ) – सुवर्ण सर्मिष्ठा लांजेकर ( U – 18) रौप्य सब ज्युनिअर मुले युवराज पेणकर ( U – 23) – सुवर्ण साहिल मासये ( U 32) सहभाग अर्जुन गोखले ( U – 25) सहभाग निल कोठारकर (U – 25) – कांस्यतनुष शिंदे ( U -38) सहभाग
द्रोण चव्हाण ( U 27) – सुवर्ण चिन्मय पेणकर ( U 27 ) – कांस्य वेदांत रहाटे ( U 25 ) सुवर्ण रिहांश चव्हाण ( U 23 ) रौप्य यज्ञेश पेणकर ( U 21 ) रौप्य साईश जाधव ( U23 ) कांस्य नक्ष पवार (U 26 ) रौप्य समन्वेद शेट्टे ( U35) रौप्य अजय सुवार (U 21) कांस्य विजय सुवार ( U 27 ) रौप्य सब ज्युनिअर मुली तिर्था चिपटे (U22 ) सुवर्ण व बेस्ट फायटर शुभ्रा गुरव ( U 29 ) सुवर्ण

 

मिताली घुमे ( U 38 ) सुवर्ण काव्या शिवलकर ( U26) सुवर्ण वेदिका रहाटे ( U32) सहभाग शुभ्रा शेट्टे ( U 29 ) सहभाग कॅडेट मुलेआयुष बावकर ( H 152 cm ) रौप्य आदित्य तेली ( H 149 cm) सुवर्ण, कॅडेट मुली गार्गी बाकाळकर ( U 48 ) सुवर्ण. व बेस्ट फायटर शाल्मली आयरे ( U48 ) रौप्य रिद्धी लांजेकर ( U 48 ) कांस्य लावण्या लांजेकर ( U51 ) कांस्य ज्युनिअर मुले श्रीपाद गंवडी ( U 55 ) रौप्य ज्युनिअर मुली रिया मयेकर ( U 42 ) सुवर्ण. व बेस्ट फायटर वैष्णवी पाटील (U-46) सुवर्ण ध्रुवी केळकर (U-55)सुवर्ण पूर्वा राऊत (U-51)सुवर्ण आस्था पिठलेकर (U59) रौप्य, सिनियर मुले अंश गुंडये (U-58) रौप्यगौरव धालावलकर (U-74)सुवर्ण हितेंद्र सकपाळ (U54)सहभाग सिनियर मुली पूर्वा राऊत (U52)सुवर्ण श्रुतिका मांडवकर (U-46)रौप्य पुमसे फ्री स्टाईल पूमसे सब जुनिअर मुले (वैयक्तिक) श्वेत नाचरे – सुवर्ण नील कोठारकर-सहभाग तनुष शिंदे सहभाग, सब जुनियर मुली वैयक्तिक मृदुला घुमे सहभाग शुभ्रा गुरव कास्य, सब जुनियर संघ शुभ्रा गुरव तीर्था चिपटे द्रोण चव्हाण रौप्य युवराज पेनकर मिताली घुमे शुभ्रा शेट्टी शर्मिष्ठा लांजेकर यज्ञेश पेनकर सहभागी चिन्मय पेनकर समवेद शेट्टी सब ज्युनिअर जोडीकाव्य शिवलकर साहिल मासाये रौप्यकॅडेट मुले वैयक्तिक आयुष बावकर कास्य कॅडेट मुली वैयक्तिक गार्गी बाकाळकर- रौप्य प्रांजली चव्हाण सहभाग कॅडेट जोडी आदित्य तेली गार्गी बाकाळकर सुवर्ण कॅडेट संघ गार्गी बाकाळकरआदित्य तेली आयुष बावकर रौप्य शाल्मली आयरे प्रांजली चव्हाण जूनियर रेगुलर पुमसे.