तिएत्रि संगीत सभेने रसिक मंत्रमुग्ध

 

 

माखजन |वार्ताहर :रत्नागिरीतील प्रख्यात गायिका मुग्धा भट सामंत यांचे वडील कै.गजानन यशवंत भट यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या ‘तिएत्रि’ संगीत सभेला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.दर वर्षी १६ जुलै रोजी कै.गजानन भट यांच्या जयंती दिनी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी च्या संगीत सभेला मुग्धा भट सामंत यांनी स्वतः व त्यांचे शिष्य आदींनी आली गायन सेवा केली.यावर्षीची संगीत सभा तिलवाडा,एकताल,त्रिताल या तीन तालावर आधारित होती.छोट्या कलाकारांपासून ते मोठ्या कलावंतांपर्यंत सगळ्यांनी या तीन तालावर विविध राग आळवले.म्हणून या वर्षीच्या संगीत सभेला तिएत्रि संगीत सभा असे नाव देण्यात आले होते.यामध्ये सगळ्या मुलांनी शास्त्रीय गायन केल त्यामधील छोट्या मुलांनी छोटा ख्याल व तराणा गायली.तर मोठ्या मुलांनी बडा ख्याल,द्रुत बंदिश ,तराणा या आधारे गहन केलं.कार्यक्रमाची सुरवात कै.गजानन भट यांच्या प्रतिमेला, सौ मुग्धा भट सामंत,व योगेश सामंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.या संगीत सभेत सूत्रसंचालन डॉ.जयश्री जोग यांनी केलं.

या संगीत मैफिलीत छोट्या कलाकारांसह सार्था गवाणकर,कल्पना जोगळेकर,समृद्धी रानडे,सानिका लिंगायत,सानिका गोखले,प्राजक्ता जोगळेकर,डॉ.मेधा गोंधळेकर,समृद्धी रसाळ, आदींनी आपली कला सादर केली.या मैफिलीला चैतन्य पटवर्धन,महेश दामले,केदार लिंगायत,प्रथमेश शहाणे,पुष्कर सरपोतदार,ओजस करकरे आदींनी साथसंगत केली.

सरते शेवटी सौ मुग्धा भट सामंत यांनी राग नट बिहाग गाताना त्याचा बडा ,छोटा ख्याल सादर केला.व भैरवीची बंदिश पेश करत रागधारी संगीत मैफिलीची सांगता केली.