दापोली l प्रतिनिधी :दापोली येथील स्नेहदीप दापोली संचालित इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयाचा ४० वा वर्धापनदिन शुक्रवार दि. १२ जुलै २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून स्नेहदीप दापोली संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा स्मिता सुर्वे उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर शिंदे साहेव अध्यक्ष कुणबी सेवासंघ दापोली हे उपस्थित होते.
दीपप्रज्वलन झाल्या नंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर जालगांवकर सर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. यानंतर विद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष डॉ.दीपक हर्डीकर पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी संस्था व विद्यालयाच्या जमेच्या बाजू मांडल्या. कार्य कमास उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर सांस्कृतिक कार्यकम म्हणून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य पाहून उपस्थित भारावून गेले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इ.१ली ते इ. ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्याथ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर विद्यालयाचे कर्मचारी विनोद धोत्रे भाई यांना या वर्षाचा जेष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या सन्मानास उत्तर देताना विनोद धोत्रे भाई यांनी सर्व संचालकांचे ऋण व्यक्त केले. आयोजकांनी केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या खोचरे, रोटरी क्लब दापोली यांनी या वर्धापन दिना निमित्त शुभेच्छा दिल्या व रू. एक हजार देणगी दिली वेळोवेळी सहकार्य करण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रभाकर शिंदे यांनी संस्था व विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ही मुले कोणाही पेक्षा कमी नसल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या चेह- यावरचे हास्य व आनंद पाहून सरंथेस धन्यवाद दिले. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असे श्री. दिलीप कुलकर्णी पर्यावरण तज्ञ यांच्या विषयी माहिती दिली. तसेच जितेंद्र पराडकर कला शिक्षक, पैसा फंड विद्यालय यांनी निर्माण केलेल्या कला दालना विषयी सविस्तर माहिती दिली. या कला दालनास विद्यालयातील विद्यार्थ्यांसह आपण भेट दयावी असे आवाहन करण्यात आले. भविष्यात संस्थेने माझ्यावर जर भौतिक व शैक्षणिक जबाबदारी टाकल्यास मला आवडेल असे सांगितले. कु. चेतन पशिलकर याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करा असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. संस्थेचे प्रयत्न वाखाणण्या सारखे असल्याचे त्यांनी म्हटले. संस्थेच्या व विद्यालयाच्या उपक्रमास वर्धापन दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यानंतर संस्थेच्या अध्यक्षा स्मिता सुर्वे यांनी प्रमुख पाहुणे प्रभाकर शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले कर्णबधिर विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे संस्थेचे ध्येय आहे. कु. चेतन पाशिलकर या माजी विद्यार्थ्याने मिळविलेल्या यशा बद्दल संस्थेला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.’ विद्वत जन येती घरा तोचि दिवाळी दसरा. या उक्ती प्रमाणे जेंव्हा जेंव्हा विद्यालयात विद्वान मंडळी कार्यक्रमाच्या माध्यमातून येतात व आम्हास मार्गदर्शन करतात तेंव्हा आम्हाला व आमच्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो म्हणून अशी मंडळी वारंवार आली पाहिजेत असे आम्हाला वाटते. म्हणून आज ‘आनंदाची डोही आनंद तरंग ‘याप्रमाणे आम्ही खूपच आनंदी आहोत ज्यांच्या साठी ही शाळा उभी राहिली त्यांच्यातील आत्मियता आज पहायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले अनेक देणगीदार, हितचिंतक व मान्यवर मंडळीच्या सहकार्यामुळे ही शाळा उभी असल्याचे त्या म्हणाल्या उपस्थित सर्वाचे त्यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रभाकर शिंदे, स्नेहदीप दापोली संस्थेचे सर्व मान्यवर संचालक, सुनिता जैन, रोटरी क्लब दापोलीच्या सौ. खोचरे, विद्यालयाचे मरख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी,हितचिंतक, देणगीदार, आवर्जुन उपस्थित होते.









