खेड(प्रतिनिधी) गणपती उत्सवा निमित्त एसटी महामंडळाने शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई आणि शिवतर विकास मंडळाच्या मागणी नुसार ठाणे- शिवतर ज्यादा बस सुरू करण्यात येणार आहे.
ही बस दिनांक ०४ सप्टेंबर २०२४ पासून ठाणे (खोपट) येथून सकाळी ०८:१५ वाजता सुटेल.
सदर एसटी बसची बुकिंग खोपट बस स्थानक मध्ये चालू झाली आहे. तरी शिवतर, जामगे, आंबये, मूरडे, चाकाळे, भडगाव व खेड तालुक्यातील प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे







