कुटुंबीयांसह साजरा केला वाढदिवस
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, कणकवलीचे आमदार नितेश राणे तसेच राज्यातील अन्य मंत्री, खासदार, आमदार व विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
केसरकर यांनी आपल्या मुंबई येथील निवासस्थानी कुटुंबीयांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी सौ. पल्लवी केसरकर, मूलगी सौ. सोनाली वगळ , जावई सिद्धार्थ वगळ व नातू अर्जून आदी उपस्थित होते.
केसरकर यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ते मतदारसंघात उपस्थित नसले तरीही ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत त्यांनी विविध कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्या. तसेच मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.










