खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील शिरवली क्र.१ प्राथमिक शाळेच्या कोसळलेल्या वर्गखोल्यांच्या छतावरील कौले अखेर ग्रामस्थांच्या मदतीने उतरवण्यात आली.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा
निर्णय घेण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांनी कोसळलेल्या वर्गखोल्यांच्या छताची तातडीने पाहणी करत कोसळलेल्या
वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठीही गांभीर्याने लक्ष घातले आहे.
सद्यस्थितीत या शाळेच्या दोन सुरक्षित वर्गखोल्यांसह अंगणवाडी लगतच्या विद्यालयात विद्यार्थी धडे गिरवत आहेत.
पहिल्याच दिवशी गटशिक्षणाधिकारी बाईत यांनी कार्यभार स्वीकारताच शाळेच्या वर्गखोल्यांच्या छताची पाहणी केली.
वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून लवकरात लवकर वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यामुळे
वर्गखोल्यांची लवकरात लवकर दुरुस्ती होण्याच्या ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत










