खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील रघुवीर घाट येथे जीप ने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जखमी झाल्याची घटना ७ जुलै रोजी घडली होती या प्रकरणी १७ रोजी जीप चालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
साहील सचिन कदम वय ३२ असे त्या गुन्हा दाखल झालेल्या जीप चालकाचे नाव आहे या प्रकरणी अक्षय किशोर कानडे वय – ३८ यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दिली
यातील जखमी मानस किशोर कानडे हा त्याचे ताब्यातील ज्युपीटर गाडी क्रमांक एम.एच.०८/ बी. डी / ३१२९ हीचे पाठीमागील सीटवर पुतण्या मांश, वहीनी मनिषा यांना बसवुन खोपी रघुवीर घाट चढत असताना एका वळणाचे रस्त्यावर समोरुन येणारे जीप वरील चालक साहील सचिन कदम याने त्याचे ताब्यातील वाहनाने धडक देऊन अपघात केला होता यामध्ये मानस किशोर कानडे याचे शरीराचे उजवे बरगडीचे व उजवे पायाचे मांडीचे गंभीर दुखापतीस तसेच वहीणी मनिषा व पुतण्या मांश यांचे किरकोळ दुखापतीस व ज्युपीटर गाडीचे नुकसानीस कारणीभुत झाला म्हणुन दाखल झाला आहे











