तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत सोहम देशमुखला घवघवीत यश

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : जागतिक बुद्धिबळ दिनाच्या पाश्वभूमीवर आयोजित स्पर्धेत यश मिळवित स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता सहावी मधील कु. सोहम देशमुख याची जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. न्यु इंग्लिश स्कूल मळगाव येथे बुध्दिबळ तालुका स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील तीस ते चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते. चौदा वयोगटाखलील या विद्यार्थ्यांच्या एकूण स्पर्धेच्या एकूण पाच फेऱ्या असून त्यापैकी कु. सोहम देशमुख याची चार फेऱ्या जिंकल्यावर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेकरीता निवड करण्यात आली.

सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व प्रशालेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी कु. सोहम देशमुख याचे भरभरून कौतुक केले.