आरोग्य विभागातर्फे पाटपन्हाळे विद्यालयातील विद्यार्थ्यांचा गौरव

( समृद्धी आंबेकरचा तालुका स्तरीय प्रथम क्रमांक व मानसी पालकरने पटकावला द्वितीय क्रमांक )

पाटपन्हाळे ( वार्ताहर ) गुहागर तालुका आरोग्य विभागातर्फे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत गुहागर तालुकास्तरीय निबंध स्पर्धा संपन्न झाली होती . सदर तालुकास्तरीय स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.समृद्धी सुरेश आंबेकर हिने प्रथम क्रमांक व कु. मानसी संदीप पालकर हिने द्वितीय क्रमांक संपादन केला. गुहागर तालुकास्तरीय स्पर्धेतील पाटपन्हाळे विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींचा गुहागर पंचायत समिती सभागृहात रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी व गुहागर तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र , गुलाबपुष्प व रोख रक्कम देऊन नुकताच गौरव समारंभ संपन्न झाला .

 

 

 

गुहागर तालुका आरोग्य विभागातर्फे संपन्न झालेल्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत गुहागर तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभासाठी रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये , अतिरिक्त रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे , गुहागर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगीड व कर्मचारी उपस्थितीत होते. पाटपन्हाळे विद्यालयाच्या समृद्धी सुरेश आंबेकर व मानसी संदीप पालकर या विद्यार्थिनींचा मान्यवर अधिका-यांच्या हस्ते प्रमाणपत्र , गुलाबपुष्प व रोख रक्कम प्रदान करून गौरव करण्यात आला.
कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने गुहागर तालुकास्तरीय प्रथम क्रमांक व मानसी संदीप पालकर हिने द्वितीय क्रमांक संपादन केल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातर्फे प्राचार्य व्ही.डी.पाटील , ज्येष्ठ प्रा.जी.डी. नेरले , माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख व ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस.एस.चव्हाण , शिक्षक एस.एस.घाणेकर , एस.एम.आंबेकर यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.