ओटवणे(प्रतिनीधी) ओटवणे सीनिअर क्रिकेट क्लब अर्थात रणझुंझार क्रिकेट क्लब(38+) च्या वतीने ओटवणे शाळा नंबर १ मध्ये रविवारी २१ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .रणझुंजार क्रिकेट क्लब च्या माध्यमातुन गावात सीनिअर क्रिकेट स्पर्धे बरोबरच गावात विविध उपक्रम राबविले जात असून गेल्या महिन्यातच या क्रिकेट क्लब च्या माध्यमातुन गावात , वनराईत लागवड करण्यात आली होती.
या बरोबर अनेक उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत.मात्र सध्या रक्ताची गरज पाहता क्लब ने रक्तदान सारखं शिबिर आयोजीत केले आहे यासाठी रक्त दात्यानी या रक्तदान शिबिरात सहभागी होत सहकार्य करण्याचे आवाहन रण झुंझार क्रिकेट क्लब च्या वतीने करण्यात आले आहे.











