कोनाळकट्टा हायस्कूलचे ईमारतीवर भले मोठे झाड कोसळून लाखो रुपयांची नुकसानी!!

शाळेला सुट्टी असल्याने अनर्थ टळला!!

दोडामार्ग | सुहास देसाई : आज सकाळी जोरदार पाऊस झाल्याने पाऊसाचे पाणी भरून
दोडामार्ग तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यात सकाळ पासून जोरदार पाऊस झाल्याने एम. आर नाईक हायस्कूल कोनालकट्टा ईमारती समोर असलेले भले मोठे झाड उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे

संस्थेचे दोन वर्ग बसणाऱ्या इमारतीची लाखो रुपयांची नुकसानी झाली आहे या ठिकाणचे लाकडी छप्पर व कौले फुटून नुकसानी झाली आहे आज झालेल्या पाऊसाने हे झाड उन्मळून पडले आहे मात्र आज रविवार असल्याने शाळेला सुट्टी असल्याने अनर्थ टळला म्हणावा लागेल याबाबत शाळा प्रशासनाने संबंधितांना कळविले असुन तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होतं आहे