माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन नजीक सरंद येथे सावर्डे येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवणच्या भूमिरक्षक संघातर्फे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव अंतर्गत सरंद गावात शेतकऱ्याना बीज प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गावातील शेतकरी विश्वास पवार,श्रीवर्धन जाधव, उपस्थित होते.
बीज प्रक्रिया मुळे पिकास होणारे फायदे आणि महत्त्व कृषी दुतांनी शेतकऱ्यांना पटवून सांगितले तसेच बीज प्रक्रिया पद्धत समजावून सांगितली. तरी निरंजन शिंदे,श्रेयस शिंदे, चिन्मय शेलार, हर्शवर्धन शिंदे,आदेश विघे, संकेत फडतरे,आशुतोष घुगरे, मिथील कोळपे,सुशांत पाटील,किरण उदमल्ले ,प्रसाद जाधव,सार्थक देवतर्षे, हजर होते.












