गुहागर प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज तळवलीच्या 2008- 2009 विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला.यावेळी अनेक वर्षांनी एकत्र येत विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणी जागवल्या.आपली शाळा,आपले गुरुजन व आपली बँच या सर्व जुन्या आठवणी जागवत जणू पुन्हा शाळेचे दिवस अनुभवण्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन,प्रतिमापूजन, राष्ट्रगीताने झाली.ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यात आला.यावेळी माजी मुख्याध्यापक प्रकाश शिर्के, श्रीकांत शिर्के , बसवंत थरकार व माजी शिक्षक उत्तम कचरे, माजी शिपाई विजय पवार आदी उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक महावीर थरकार शिक्षक प्रवीण केळस्कर, श्री देवरूखकर ,श्री साळुंखे, श्रीनाथ कुळे,श्री बागल, सौ. वळवी, अमोल जड्याळ,शिपाई अक्षय चव्हाण, प्रणय आरोळकर,सामाजिक कार्यकर्ते प्रदीप चव्हाण, संदीप चव्हाण हे ही उपस्थित होते.यावेळी सर्व शिक्षक व उपस्थित मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी या बॅच ने शाळेसाठी केलेल्या उपक्रमांची माहिती माजी विद्यार्थी केतन शिगवण यांनी दिली.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.













