पांग्रड येथील विश्वनाथ मर्गज यांचे निधन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पांग्रड रेडेतळवाडी येथील रहिवासी व मुंबई पोलीस डीलाईल रोड पोलीस स्टेशनचे निवृत्त पोलीस हवालदार विश्वनाथ नारायण मर्गज यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पांग्रड गावांमधील सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये ते नेहमीच सहभागी होत असत. ते परोपकारी होते.

 

 

मुंबई मिरा रोड येथील मर्गज पेट क्लिनिक चे पशुवैद्यक डॉ. राजेंद्र मर्गज व मराठी मालिका व चित्रपट दिग्दर्शक श्री ज्ञानेश्वर मर्गज यांचे वडील तर निवृत्त केंद्रप्रमुख औदुंबर मर्गज यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन विवाहित मुलगे, विवाहीत मुलगी, भाऊ बहिणी , सूना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.