खेड (प्रतिनिधी) वारकरी संप्रदाय मठ भरणे येथे जेसीआय खेडकडून आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या
शिबिराचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव व स. तु. कदम यांच्या हस्ते
झाले.
शिबिरासाठी लिजेन्ट लॅब, इन्फिगो आय हॉस्पिटल, डॉ. रियाज धुनवारे, डॉ. सौरभ पेंडसे यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमित कदम यांनी प्रयत्न केले. यावेळी पराग पाटणे, आनंद कोळेकर, दीपक नलावडे, शैलेश मेहता, दानिश पाटणे, स्वप्निल कदम, वारकरी संप्रदाय ड मठाचे गणपत येसरे उपस्थित होते. ड उपक्रम यशस्वी केल्याबद्दल कार्यक्रम प्रमुख डॉ. रियाज धुनवारे यांचे अध्यक्ष संकेत आपिष्टे व सेक्रेटरी अमर दळवी यांनी अभिनंदन केले.