आजचा दिवस कसा जाईल? 23 जुलै 2024 – मंगळवार

दैनिक भविष्यफल 21 ते 27 जुलै 2024
प्रहार डिजिटल

आजचा दिवस कसा जाईल?
23 जुलै 2024 – मंगळवार

मेष रास
आज मानसिक चिंता सतावतील. स्वतःच नको त्या कल्पना करून तुम्ही तुमचे टेन्शन वाढवून घेणार आहात. रात्री झोप येणार नाही. त्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम होईल.

वृषभ रास
आज कुटुंबासाठी वेळ काढा सर्वांशी प्रेमाने वागा ज्या काही अडचणी येतील चॅलेंजेस येतील त्यांना शांतपणे आणि योग्य प्रकारे सामोरे जा पैशाची कामे होतील चांगल्या जेवणाचा आस्वाद घेता येईल.

मिथुन रास
आज अवघड गोष्टीतून सुटका होईल. प्रवास करता येईल. प्रवासाचे योग आहेत. कुटुंबाला वेळ देता येईल दैवी मदत मिळेल.

कर्क रास
आज एकांतात वेळ घालवा. स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. लोकांमध्ये मिक्स होणे शक्यतो अवॉइड करा. मोठ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाने अडचणीतून सुटका होईल.

सिंह रास
आज सगळ्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. मनापासून आवडते काम करायला मिळेल. प्रेमाचे आणि लग्नाचे प्रपोजल देण्याघेण्याचा विचार करू शकता.

कन्या रास
आज एक साथ खूप घटना घडतील. एक झाले की दुसरे असे काम सतत चालत राहील. आनंदाच्या घटना घडतील. प्रवास केल्यास लाभ होईल. फायदा होईल. कामात यश मिळेल.

तुळ रास
आज तुमच्या मनाचे ऐका. पूर्वाभास होतील. पुढे घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज येईल. अंतः स्फूर्तीवर विश्वास ठेवा. एखादे काम करण्यापूर्वी नेमके त्यातून काय हवे आहे ते ठरवा आणि त्यानंतर काम करा नक्की यश मिळेल.

वृश्चिक रास
आज भीतीला बाजूला सारून काम करावे लागेल. मनात संशय भरून राहील. सगळीकडे संदिग्धता जाणवेल. एखादे विशेष सिक्रेट कळु शकेल. मनातल्या भीती आणि शंकांमुळे कामात पुढे जाता येणार नाही.

धनु रास
आज जे काही होईल त्याला सामोरे जा. वाईट घडून गेले. तुम्हाला व्हायचा तो धोका झाला आहे हे समजून घेऊन त्यातून बाहेर पडा. आज खात्री केल्याशिवाय कोणतेच काम हातात घेऊ नका.

मकर रास
आज पैशाचे व्यवहार करावे लागतील. एखादे लोन मिळेल. पैसे देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करावे लागतील. आज फॅमिली अथवा फ्रेंड कडून पैशाच्या तसेच इतर स्वरूपात एखादे गिफ्ट मिळू शकते. आज गरजू व्यक्तीला जेवण तसेच इतर मदत करा.

कुंभ रास
आज संघर्ष करावा लागेल. कडव्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. तुमच्या विरुद्ध एखादे कारस्थान घडू शकते. डोळे उघडे ठेवून काम करा. ऑफिसमध्ये वाद विवादाचा सामना करावा लागेल.

मीन रास
आज भाग्य साथ देइल. अडचणी मधून मार्ग निघेल. एखाद्या कामात अडचणी आल्या असतील तर त्यातून मार्ग निघेल. दैवी मदत मिळेल. पैशासंबांधित कामे होतील.

@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353