देवगड:प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये देवगड तालुक्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाखाचा विकासनिधी देणार अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे केली.ही योजना ग्रामीण भागातील शेवटच्या महिला लाभार्थींपर्यंत पोहचली पाहिजे या पध्दतीने ही योजना प्रभावीपणे राबवा असे आवाहन राणे यांनी केले.
देवगड पंचायत समिती येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रभावी अंमलबजावणी आढावा सभा आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसिलदार संकेत यमगर, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, पोलिस निरिक्षक अरूण देवकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी समीर होडावडेकर आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांनी या सभेत आढावा घेताना देवगड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी या योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट काम करणाèया प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला २५ लाखाचा विकासनिधी बक्षिस म्हणून देणार असल्याचे जाहीर केले तर द्वितीय क्रमांकासाठी १५ लाख व तृतीय क्रमांकासाठी १० लाखाचा निधी जाहीर केला.या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून १०० टक्के ही योजना यशस्वी करा असे आवाहन उपस्थित सरपंच, अधिकारी यांना केले.
शासकीय कार्यालयातून दाखले मिळविण्यासाठी अनेक वेळा ग्रामीण भागातून लाभार्थी तालुक्याचा ठिकाणी येतात मात्र त्यांना ते दाखले मिळण्यासाठी हेलपाटे घालावे लागतात यासाठी शिबीराचे आयोजन करू असेही सांगीतले.सरपंचांनी या सभेत नारीशक्ति अॅपबद्दल तसेच कार्यवाहीबद्दल अनेक प्रश्न व समस्या उपस्थित केल्या त्याचे निरसन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले.यामध्ये एडीट बटण नसणे, सव्र्हर लो असणे, ग्रामीण भागात इंटरनेट रेंज नसणे यांचा समावेश होता.ज्या गावांमध्ये इंटरनेट व्यवस्थित मिळत नाही त्या गावांमध्ये नेट सुविधा उपलब्ध करून द्या अशा सुचना आ.नितेश राणे यांनी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांना केल्या.
सुरूवातीलाच पात्र लाभार्थी व अर्ज भरलेले लाभार्थी याबाबत प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सविस्तर आढावा दिला व उर्वरीत लाभाथ्र्यांनाही अर्ज भरून घेण्यासाठी मोहिम राबवून हे अर्ज आपणाकडे येतील असा विश्वास दिला.योजनेची मुदत व शेतीची कामे यामुळे अर्ज भरण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी सांगीतले.सुत्रसंचालन मधुसूदन घोडे यांनी केले.










