हिर्लेवाडी येथे रस्ता सुस्थीतीसाठी दिले योगदान
आचरा–अर्जुन बापर्डेकर :अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या आचरा हिर्लेवाडी येथील कांबळी दुकानापासून सुमारे चारशे मिटर पर्यंतच्या खराब रस्त्यासाठी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस आणि ग्रा प सदस्य मुझफ्फर मुजावर यांनी काळी बारीक खडी उपलब्ध करुन आपली कार्यतत्परता दाखविल्या बद्धल ग्रामस्थांकडू त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
आचरा हिर्लेवाडी कांबळी दुकानापासून सुमारे चारशे मीटर रस्त्यावरील दगड आणि माती वाहून गेल्यामुळे रस्त्यावरुन चालताही येत नव्हते अशी स्थिती निर्माण झाली होती.
रस्ता दुरुस्ती बाबत हिर्लेवाडी विकास मंडळाकडून ग्रामपंचायतीकडे मागणी करण्यात आली होती.याबाबत सरपंच जेराॅन फर्नांडिस आणि या भागाचे प्रतिनिधित्व करणारे ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर यांनी याबाबत पुढाकार घेत सहा ब्रास बारीक काळी खडी उपलब्ध करून दिली.यावेळी सरपंच जेराॅन फर्नांडिस ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर यांच्या सोबत हिर्लेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष पांडूरंग वायंगणकर, रामेश्वर सेवा सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर यांच्या सह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.












