भाजप कडून वडाचापाट येथे शालेय विध्यार्थ्यांना वह्यावाटप!

मसूरे | झुंजार पेडणेकर : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून वडाचापाट प्राथमिक शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मालवण पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, सरपंच सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, ग्राम. सदस्य विनायक प्रभुदेसाई, सौ सविता पालव, विराज पाटकर, सौ शामल मांजरेकर, सौ वेदिका माळकर, सौ दर्शना कासले, उधोजक दया देसाई, भाजप कार्यकर्ते प्रथमेश पालव,रामचंद्र कासले श्रीकांत पाटकर, समीर मुंबरकर प्रवीण पाताडे, सचिन हडकर महादेव पालव, भानुदय कासले, सिद्धेश मुंबरकर, श्रीकांत घाडीगावकर, शामसुंदर सामंत, मुख्याध्यापिका सौ मालंडकर, शिक्षिका सौ पालव आदी उपस्थित होते. वह्या वाटप केल्या बद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.