खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गा वरील लोटे एमआयडीसी नजीक धावत्या कारला ओव्हरटेक करून कारच्या दर्शनी बाजूकडील काचेवर पाण्याची भरलेली बाटली फेकून काच फोडल्या प्रकरणी ४ अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना २५ जुलै रोजी घडली
लोटे एम.आय.डी.सी येथील गोवा मुंबई येथील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनातील अज्ञान चार व्यक्तीने ओव्हरटेक करून जात असतांना कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला तसेच वाहनाची समोरील एक काचेची बॉटल मारुन फोडुन नुकसान केले. तसेच गाडीतून बाहेर पडण्याचे सांगुन मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे









