लांजा | प्रतिनिधी : तालुका विधी सेवा समित्तर्फे आज शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक आदालतीमध्ये लांजा येथील न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या फौजदारी खटल्यांपैकी एकूण १५ तर दिवाणी प्रकरणा पैकी ०१ प्रकरण निकाली काढण्यात आहे.
प्रलंबित खटल्या मधून एकूण रक्कम रुपये २९,१६,५४५ /- ची वसुली करण्यात आली आहे. तसेच बँकेचे वादपूर्व प्रकरणांमध्ये एकूण ०७ प्रकरणे निकाली झाली असून रक्कम रुपये ५,१७,०००/- एवढी तडजोड रक्कम झाली आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्यामधील ०३ प्रकरणे निकाली झाली असून, ०१ प्रकरणात महिला सासरी नांदायला गेली आहे.
सदर लोकअदालतमध्ये पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश पी. आर. भोसले यांनी तर पॅनल सदस्य म्हणून ॲड. समीर दळवी यांनी काम पाहिले.











