मार्गताम्हानेत तात्यासाहेब नातू यांना आदरांजली

 

गुहागर l प्रतिनिधी : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील

वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय व कै.सौ कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ

महाविद्यालयात संस्थेच्या रुक्मिणी गणपत चव्हाण सभागृहात 25 जुलै हा दिवस

संस्थेचे संस्थापक डॉ. तात्यासाहेब नातू यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात

आला. मुख्याध्यापक भाऊ लकेश्री यांनी स्व. तात्यासाहेब नातू यांच्या

प्रतिमेचे पूजन केले. प्रास्ताविक शिक्षिका सौ. मंजिरी दळवी यांनी केले.

 

मार्गताम्हाने, रामपूर, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी, नव कोकण शिक्षण

संस्था, डीबीजे कॉलेज आदी संस्थांचे तात्यासाहेब संस्थापक होते. विंचू

दंशावरील लसीचे प्रवर्तक होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. यावेळी

पर्यवेक्षक, विनोद पवार, व्ही. व्ही. वणवे, सुशील कुमार कुंभार, महेंद्र

साळगांवकर, सौ मुग्धा पवार, सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी व

विद्यार्थी उपस्थित होते.