राजापूर (वार्ताहर): तालुका विधी सेवा समितीतर्फे शनिवार शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक आदलेत मध्ये राजापूर येथील न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या फौजदारी खटल्यांपैकी एकूण दहा खटले तर दिवाणी प्रकरणांपैकी एकूण आठ प्रकरण निकाली झाले आहेत.
प्रलंबित खटल्यांमधून एकूण रक्कम रुपये 17 लाख 58 हजार 59 ची वसुली करण्यात आली आहे. तसेच बँकेचे वादप्रयोग प्रकरणांमध्ये एकूण दहा प्रकरणे निकाली झाली असून रक्कम रुपये 26 लाख 75 हजार 180 एवढी तडजोड रक्कम झाली आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्यामुळे एक प्रकरण निकाली झाले असून त्या प्रकरणात महिला नांदायला सासरी गेली आहे.
सदर लोकादालत मध्ये पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश श्री. एस एस नलवडे तर पॅनल सदस्य म्हणून वकील श्री. आर. एस. राणे होते.










