खेड(प्रतिनिधी) लायन्स क्लब ऑफ खेड सिटी च्या वतीने ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक दृष्टीने सॅनिटरी पॅडचे वाटप व त्याचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तळे हायस्कुल येथे कुमरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले
तसेच .तळे येथील अंगणवाडीतील मुलांसाठी खाऊ वाटप केले.सदरचा उपक्रम ऐश्वर्या एंटरप्राईझसच्या मोरे यांच्या सौजन्याने करण्यात आला.यावेळी लायन्स क्लब खेड सिटी चे अध्यक्ष लायन सुरेश चिकणे, उपाध्यक्ष . विनोद मोरे, प्रफ़ुल्ल मोरे,विध्यार्थीनी, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते










