कणकवली : काँग्रेसचे नागेश मोरये हे नांदगाव गावातील आहेत.परंतु त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये नांदगाव गावामध्ये चालू असलेला अडीच कोटीचा रस्ता वाहून गेला आहे.ग्राम पंचायत वरती प्रेशर आहे असे केले आरोप धाधांत खोटे आहेत.ज्यांनी प्रशासकीय यंत्रणा हाताळली आहे. ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर बोलू नये.असा सल्ला नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरोजकर यांनी दिला आहे.
जो अडीच कोटीचा रस्ता चालू आहे तो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरू आहे. आणि त्याचे काम पन्नास टक्के पूर्ण आहे. तो दिवाळीनंतर पूर्ण होईल.महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेल्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती पाच वर्ष कंत्राट दाराकडेच असते. तसेच रस्त्याचे काम सुरू असताना चार पाच वेळा अभियंता येऊन त्या रस्त्याचं परीक्षण केलं जातं त्याची क्वालिटी चेक केली जाते.सदर रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचेच होईल यात तिळमात्र शंका नाही.इतरही रस्ते दिवाळीनंतर पूर्ण होतील.जलजीवन मिशनचे काम सुद्धा शक्य तितक्या प्रमाणात पूर्ण करायचा प्रयत्न सुरू आहे. वाढीव निधी उपलब्ध झाल्यावर लवकरात लवकर काम पूर्ण होईल.त्यामुळे नागेश मोरये यांनी केलेली विधाने चुकीची आहेत.आमदार नितेश राणे यांनी ग्राम पंचायत निवडणुकीच्यावेळी बोलल्याप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा जास्त पाच पट निधी नांदगाव गावाला उपलब्ध करून दिलेला आहे.नागेश मोरये यांनी नक्कीच विधानसभेसाठी इच्छुक राहावे आणि निवडणूक लढवावी मी त्यांना शुभेच्छाच देतो असे सरपंच भाई मोरोजकर यांनी म्हटले आहे.












