वेताळगड दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम संपन्न

 

मालवण । प्रतिनिधी :     दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे मालवण तालुक्यातील वेताळगडावर दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली.

दुर्ग संवर्धन करताना नाईलाजाने काही ठिकाणची झाडे तोडावी लागतात. या तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत संवर्धन केलेल्या गडावर दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. गेल्यावर्षी वेताळ गडावर कदंब झाडे लावण्यात आलेली होती. यावर्षी वेताळगडावर जांभूळची झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणबरोबर मोहिमेस आलेल्या नवीन सदस्यांना संपूर्ण गडाची माहिती तसेच ठिकाणे दाखवण्यात आली.

या मोहिमेस गणेश नाईक, समिल नाईक, योगेश येरम, साईप्रसाद मसगे, गार्गी नाईक, प्रसाद पेंडूरकर, मारुती चव्हाण, सदा घाडी, अनिकेत गावडे, नेहा गावडे, दुर्गेश गावडे, कविष गावडे ईत्यादी उपस्थित होते. या मोहिमेसाठी सुषमा पालव यांनी लागणारी जांभूळ झाडे दिली. तसेच मारुती चव्हाण व उत्कर्षा वेंगुर्लेकर यांनी अल्पोपहाराची सोय केली. उपस्थितांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार मानण्यात आले.