खेड(प्रतिनिधी) खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील इयत्ता 11th कॉमर्स मधील विद्यार्थिनी तनुश्री गणेश नारकर हिने महाराष्ट्र राज्य तायक्यांदो असोसिएशन यांच्यातर्फे . बीड येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय तायक्यांदो स्पर्धेत ५५ ते ५९ किलो वजनी गटांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. तिची पुढे औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील तायक्यांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तनुश्रीच्या या यशाबद्दल तनुश्रीचे तिच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षक शशांक घडशी, संतोष भोसले, मारुती आडाव यांचे संस्था व प्रशालेतर्फे अभिनंदन करण्यात आले










