खेड (प्रतिनिधी)सीएसएमटी मुंबई येथील फलाट क्रमांक १०, ११, १२ व १३च्या लांबीच्या विस्तारीकरण कामामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या तीन रेल्वेगाड्या ३० ऑगस्टपर्यंत ठाणे-दादर स्थानकापर्यंत ‘शॉर्ट टर्मिनेट’ करण्यात आल्या आहेत.
या गाड्यांचा प्रवास ठाणे व दादर स्थानकात संपणार आहे. मंगळूर-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस ३० ऑगस्टपर्यंत ठाणे स्थानकापर्यंत धावेल. मडगाव-सीएसएमटी मुंबई तेजस एक्सप्रेसचा प्रवास दादर स्थानकापर्यंत संपेल. मडगाव- सीएसएमटी मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसही ३० ऑगस्टपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहे.











