दि. ५, १२,१९ आणि २६ ऑगस्ट या दिवशी सोडणार विशेष बस सेवा
लांजा( प्रतिनिधी) श्रावण महिन्याचे औचित्य साधून लांजा एसटी आगारा मार्फत खास मार्लेश्वर दर्शन बसफेरी सोडण्यात येणार आहे दिनांक ५, १२,१९ आणि २६ या दिवशी सकाळी ८ वाजता ही विशेष बसफेरी सोडण्यात येणार आहे.
श्रावण महिन्याचे औचित्य साधून लांजा आगारा मार्फत ही खास विशेष बस फेरी सोडण्यात येणार आहे. यामध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत ठेवण्यात आली आहे. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तर ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना खास मोफत प्रवास प्रवास करता येणार आहे. फुल तिकीट २२५ तर हाफ तिकीट ११५ रुपये आहे .
या मार्लेश्वर दर्शन बसफेरीचा लाभ घेण्यासाठी विद्याधर कुवेस्कर ९४२२३७६०८, अनिल लांजेकर ९४२३२९७२९७, सदाशिव तोरणे ८५५१०१७०६५ आणि जयवंत जाधव ८४५९४८०४६ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे. तरी तालुक्यातील जनतेने या मारलेश्वर दर्शन बस चा लाभ घ्यावा असे आवाहन लांजा एसटी आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी केले आहे











