गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरूअभिवादन सोहळा संगीतमय वातावरणात संपन्न

शिष्यांनी दिली आपली गुरु माऊली दिप्तेश मेस्त्री सरांना अनोखी संगीत वंदना.  

ओटवणे(प्रतिनिधी) आपल्या गुरु माऊलीला अभिवादन करण्यासाठी शिष्यानी आयोजित केलेला गुरुकुल शिक्षण संस्थेचा गुरू अभिवादन सोहळा असंख्य शिष्यांच्या उपस्थीतीत मळगाव येथील भगवती सभागृहात उत्साहात पार पडला.अभिवादन सोहळ्याचे उदघाटन संगीत अलंकार गुरुमाऊली दिप्तेश मेस्त्री यांच्या हस्ते तळवणे मटाधीपती सावंतवाडी संस्थान राजगुरू राजेंद्र स्वामी भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य शिष्यगणांच्या उपस्थितीत पार पडले. गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निर्माते दिप्तेश मेस्त्री सराना शिष्यांनी गायनातून अनोखी गुरुवंदना दिली .यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सचिन गावडे खजिनदार दर्शिता मेस्त्री,सचिव गीतेश परब , सहसचिव रोहित निर्गुण यांनसह सदस्य,शिष्य गण मोठ्या संख्येने आपल्या गुरुला अभिवादन करण्यासाठी उपस्थीत होते.यावेळी संस्थेच्या पदाधिकारी, सदस्य यांसह उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात दिप्तेश मेस्त्री सरांनी आपल्या सुमधुर आवाजाने कार्यक्रमांची सुरुवात केली आणि आपल्या मनोगतातून आपल्या शिष्याना अनमोल संदेश तर दिलाच त्याबरोबर गायन कलेतील छोटया छोट्या गोष्टी समजावून सांगत या अभिवादन सोहळ्यातही आपल्या शिष्याना संगीताचे धडे शिकविले.

 

 

अनेक शिष्यांनी गायनातून आपल्या गुरूला अभिवादन केले. संस्थेला अधिकृत मान्यता मिळाली असून नव्या मान्यताप्राप्त गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या लोबोचेही यावेळी अनावरण करण्यात आले.संपूर्ण सोहळ्यात अनेक मुलांनी गायन केले गुरु माऊली प्रति अनेकांनी आपल्या शब्दातून भावना व्यक्त केल्यात.या सोहळ्यात भावेश राणे आणि मनीष तांबोस्कर यांच्या पखवाज तबला जुगलबंदी सह संगीत सौभद्र सवेश नाट्यप्रयोग पार पडला अजित पोळजी, पुरुषोत्तम परब या शीष्यानी गुरु माऊली दिप्तेश मेस्त्री सरांवर केलेली काव्य रचना आणि संगीतमय करत केलेलं सादरीकरण याने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.या बरोबर दिप्तेश मेस्त्री सरांवर विषेश प्रेम असणारे ओटवणे गावातील जेष्ठ कवी कृष्णा देवळी यांनी उपस्थित राहून सरांवर केलेली सुंदर काव्य रचना निवेदकांकरवी सादर केली.सरांचा जीवन प्रवास उलगडत शिष्यानी आपल्या गुरूला अनोख सरप्राईझ दिल.

 

 

अनेक मान्यवरांनी या संगीताने सजलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेला शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम सकाळी सुरु झाल्यापासून रात्री उशिरा पर्यंत सुरु होता. अनेक कार्यक्रम त्याच बरोबर दुपारी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते .अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. शिष्यगणा बरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही या सोहळ्यात उपस्थित राहून या कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य मिळवील. ऍडव्होकेट सचिन गावडे, बंड्या धारगळकर, प्रसाद मेस्त्री, अमित मेस्त्री, प्रदीप वाळके, यमेश खवणेकर, बाळू कांडरकर, नीरज भोसले, रपेंद्र परब,कवी कृष्णा देवळी, संजय गावडे,सुधीर राऊळ, आनंद मोर्ये,सचिन देसाई,मोहन मेस्त्री, महेंद्र मांजरेकर, यांसह जिल्हा भरातील,गोवा राज्यातूनही शिष्यगण संगीत क्षेत्रातील महनिय व्यक्ती या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होत्या. या संपूर्ण संगीतमयी नेत्रदीपक गुरु अभीवादन सोहळ्याचे सूत्रसंचालन काका सावंत, अक्षय सातार्डेकर यांनी तर आभार आडेलकर सरांनी मानलेत.