अमित खोत | मालवण: ‘राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था’, धाराशिव (उस्मानाबाद) आयोजित ‘मी ज्ञानी होणार’ या राज्यस्तरावर घेण्यात येतं असलेल्या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय बिळवस येथील कु. हर्षिता संतोष पालव हिने जिल्ह्यात प्रथम आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत आवड निर्माण व्हावी, मी उद्देशाने उस्मानाबाद जिल्ह्यातील राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्था, गेली चार वर्ष मी ज्ञानी होणार ही स्पर्धा परीक्षा घेत आहेत. यावर्षी माध्यमिक विद्यालय बिळवस मधील, इयत्ता ६ वी मध्ये शिकणाऱ्या कु. हर्षिता संतोष पालव हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कु. दूर्वा उदय पालव (इयत्ता ५ वी), कु. चैताली श्रीराम पालव ( इयत्ता ७ वी), कु. रिया रवींद्र पालव ( इयत्ता ८ वी) या सर्वांनी घवघवीत सुयश संपादित केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव , सचिव अशोक पालव, कार्याध्यक्ष दाजी विश्राम पालव, प्रशालाचे मुख्याध्यापक जयवंत ठाकूर, या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पालव आणि मार्गदर्शक शिक्षिका सौ. अनुष्का कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.












