सरंद येथे यंत्राद्वारे भातलागवडीचे प्रात्यक्षिक

तहसीलदार अमृता साबळे यांची उपस्थिती

माखजन |वार्ताहर :     संगमेश्वर तालुक्यतील माखजन नजीक सरंद येथे,शंतनू बापट यांच्या शेतात कृषी विभागातर्फे यंत्राद्वारे भातलावणी चे प्रात्यक्षिक घेण्यात आले.यावेळी संगमेश्वर तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती अमृता साबळे उपस्थित होत्या.

महसूल पंधरवाडा आयोजित कृषी मार्गदर्शन कार्यक्रम १ ते १५ ऑगस्ट अस सर्वत्र साजरा केला जात आहे.सरंद येथे झालेल्या या प्रशिक्षणाला तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे स्वतः उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले.

विनोद हेगडे यांनी यंत्राद्वारे भात लागवडीचे महत्त्व व काळाची गरज याविषयी मार्गदर्शन केले, सदर प्रात्यक्षिकाला मंडळ कृषी अधिकारी श्री प्रभाकर कांबळे, मंडळ आधिकारी श्री मंडले,कृषी सहाय्यक श्री भानुदास दौंड, सरपंच श्रीमती सोनाली जाधव, उपसरपंच श्री उमेश पवार, पोलीस पाटील श्री नंदन भागवत, तलाठी श्री सुरेश जाधव, श्री आंग्रे, श्री दिगंबर चौधर, ग्रामसेवक श्री कांबळे, प्रगतशील शेतकरी श्री संतोष गोटेकर, शक्तिमान कंपनीचे मॅनेजर श्री यश नामदास, श्री सूरज, श्री अमित मलाप व सुमारे ५० हुन अधिक शेतकरी उपस्थित होते.

तसेच दुपार सत्रात महसूल पंधरवडा अंतर्गत कृषी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रस्तावना श्री एम आर कांबळे यांनी केली. तसेच पुढे भात लागवडीच्या पद्धती विषयी श्री प्रभाकर कांबळे मंडळ कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महाडीबीटी,पी.एम.एफ.एम.ई, डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना इत्यादी योजनाबद्दल तालुका कृषी अधिकारी श्री विनोद हेगडे यांनी मार्गदर्शन केले.

महसूल पंधरवडा अंतर्गत विविध योजनांचे मार्गदर्शन माननीय तहसीलदार श्रीमती अमृता साबळे यांनी देखील मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास सरपंच श्रीमती सोनाली जाधव, उपसरपंच श्री उमेश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री दीपक जाधव, मंडळ आधिकारी श्री मंडले ,

कृषी सहाय्यक श्री भानुदास दौंड, तलाठी श्री सुरेश जाधव, श्री आंग्रे, श्री दिगंबर चौधर, ग्रामसेवक श्री एम आर कांबळे, पोलीस पाटील श्री नंदन भागवत, प्रगतशील शेतकरी श्री संतोष बाळाराम गोटेकर, श्री शंतन बापट, तंटामुक्ती अध्यक्ष श्री विश्वास पवार, श्री संदीप पवार, गावकर श्री अनंत गोटेकर आदी शेतकरी ,ग्रामस्थ उपस्थित होते.